पालघर पोटनिवडणुकीची वेळ वाढवून द्यायची शिवसेनेची मागणी फेटाळली
पालघर पोटनिवडणुकीत व्हीव्हीपॅट बिघडल्यामुळे वेळ वाया गेल्यानं मतदानाची वेळ वाढवून देण्याची शिवसेनेची मागणी जिल्हाधिका-यांनी धुडकावलीय. त्यामुळे मतदानाची वेळ वाढवून मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय.
पालघर : पालघर पोटनिवडणुकीत व्हीव्हीपॅट बिघडल्यामुळे वेळ वाया गेल्यानं मतदानाची वेळ वाढवून देण्याची शिवसेनेची मागणी जिल्हाधिका-यांनी धुडकावलीय. त्यामुळे मतदानाची वेळ वाढवून मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. मात्र सहा वाजेपर्यंत रांगेत जेवढे मतदार असतील त्यांना मतदान करू दिलं जाणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे अनेक मतदारांना निराश होऊन माघारी जावं लागलं. त्यामुळे वेळ वाढवून देण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली होती. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात देण्यात आलं होतं. मात्र ही मागणी फेटाळून लावण्यात आलीय.