पालघर आणि भंडारा गोंदिया निकाल अपडेट : भंडारा-गोंदिया अपडेट (01.40 PM) राष्ट्रवादीचा एक खासदार वाढण्याची तर भाजपाला एक खासदार गमवावा लागण्याची शक्यता आहे, कारणभंडारा-गोंदियात राष्ट्रवादीने शेवटच्या टप्प्यात जोरदार मुसंडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे भाजपाचे हेमंत पटले यांच्यापेक्षा २० हजार मतांनी आघाडीवर आहेत. ही जागा यापूर्वी भाजपकडे होती, भाजप खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक होत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या भागातच भाजपाला एक खासदार गमवावा लागतोय हा भाजपासाठी मोठा धक्का आहे. (01.25 PM) राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना १ लाख ६२ हजार मतं आहेत, तर भाजपाचे हेमंत पटले यांना १ लाख ४९ हजार मतं आहेत, अजून मतदानाच्या फेऱ्या सुरू आहेत, पालघर अपडेट (01.03 PM) पालघर पोटनिवडणूक राजेंद्र गावित यांचा २६ हजार मतांनी विजय झाला आहे.  शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांना २ लाख ३७ हजार मतं पडली आहेत. गावित यांना २ लाख ६३ हजार मचं पडली आहेत.जनतेच्या पाठिंब्यामुळे आपला विजय झाला असल्याचं राजेंद्र गावित यांनी म्हटलं आहे. पालघरमध्ये भाजपाने जोरदार सेलिब्रेशन सुरू केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भंडारा-गोंदिया अपडेट (12.30 PM) भंडारा गोंदियात डाव पलटला आहे, राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे, भाजपाचे हेमंत पटले यांच्यापेक्षा ३२०० मतांनी दहाव्या फेरीत मागे पडले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या भागातच राष्ट्रवादीला कमी मतं, तर भाजपला आघाडी मिळाली असल्याचं सांगण्यात येत आहे.


भंडारा-गोंदिया अपडेट (12.03 PM) : राष्ट्रवादीचे उमेदवार मधुकर कुकडे, भाजपाचे हेमंत पटले यांच्यापेक्षा २८०० मतांनी आघाडीवर आहेत.


पालघर अपडेट (11.40 AM) आघाडी ) बाराव्या फेरी अखेरची आघाडी भाजपच्या राजेंद्र गावितांना 1,24,183 मतं, शिवसेनेच्या श्रीनिवास वनगांना 1,05,000 मतं, बहुविआचे बळीराम जाधव ८६ हजार मतं


पालघर अपडेट (11.33 AM) दहाव्या फेरी अखेरची आघाडी
भाजपाचे राजेंद्र गावित १७ हजार मतांनी आघाडीवर, भाजपाचे  राजेंद्र गावित  यांना १ लाख १३ हजार मतं, शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांना ९५ हजार मतं, बहुविआचे बळीराम जाधव यांना ७८ मतं


पालघर अपडेट 11.09 AM- आठव्या फेरीचं अपडेट - भाजपा - राजेंद्र गावित 91 हजार मतं, शिवसेना - श्रीनिवास वनगा 73 हजार मतं, बहुविआ - बळीरान जाधव 62 हजार मतं


(पालघर अपडेट 10.55 AM) : पालघरमध्ये सातव्या फेरी अखेरीस भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. भाजप आणि शिवसेना उमेदवारांच्या मतात १६ हजारांचा फरक पडला आहे, भाजपाचे डॉ.राजेंद्र गावित १६ हजार मतांनी आघाडीवर आहेत. यामुळे ही आघाडी कायम राहिली तर भाजप विजयाकडे जाण्याची शक्यता वाढली आहे, तर शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी आपण आणखी येणाऱ्या पुढच्या फेरीत आघाडी घेऊ असा विश्वास व्यक्त केला आहे.


(भंडारा गोंदिया अपडेट 10.52 AM) :  भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत अटीतटीची लढत सुरू आहे, भाजपा उमेदवारापेक्षा राष्ट्रवादीचा उमेदवार अवघ्या ७०० मतांनी आघाडीवर आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार मधुकर कुकडे यांना १८ हजार ०२८ मतं आहेत, तर भाजपाचे हेमंत पटले यांना १७ हजार २४६ मतं आहेत.


(पालघर अपडेट 10.15 AM) पालघर आणि भंडारा गोंदियात निकालाचा कल काहीसा बदलला आहे. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा (42 हजार) हे तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर आले आहेत, पण याच वेळी भाजपाचे गावित (५६ हजार) यांची आघाडी, १० हजारावरून १४ हजारावर वाढली आहे.


तर भंडारा गोंदियात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांची आघाडी १ हजार मतांवरून वाढून साडेतीन हजारावर गेली आहे, राष्ट्रवादीसाठी हे दिलासादायक बातमी आहे.


भंडारा गोंदिया | तिसऱ्या फेरीनंतर अपडेट (09.46)


भाजपापेक्षा राष्ट्रवादीचा उमेदवार १ हजार मतांनी आघाडीवर आल्याने, भंडारा-गोंदियातील बाजी पलटली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार मधुकर कुकडे यांना आघाडी मिळाली आहे.


उत्तर प्रदेशातील कैराना पोटनिवणुकीतही भाजपाचा उमेदवार पिछाडीवर आहे.


भंडारा गोंदिया | तिसऱ्या फेरीनंतर अपडेट देण्यात आलेलं नाही.


अपडेट पत्रकारांना का देण्यात येत नाहीय, याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.  त्यामुळे भंडारा-गोंदियात गोंधळ उडतोय. (अपडेट 09.41  AM)


पालघर अपडेट  | चौथ्या फेरीचं अपडेट (09.31 AM)


शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांना २६ हजार मतं


बविआचे बळीराम जाधव  ३० हजार मतं


भाजपाचे राजेंद्र गावित यांना ३५ हजार मतं


भंडारा गोंदिया - भाजपाचे उमेदवार आघाडीवर  (09.30 AM)


तुमसरसोडून इतर विधानसभा क्षेत्रात भाजपा आघाडीवर


पालघर अपडेट  | दुसऱ्या फेरीचं अपडेट (09.20 AM)


दुसऱ्या फेरीत भाजपाचे राजेंद्र गावित आघाडीवर, 


पालघर अपडेट  | पहिल्या फेरीचं अपडेट


भाजपा- राजेंद्र गावित ११ हजार, २३६ मतं


बहुजन विकास - बळीराम जाधव, ११ हजार ९० मतं


शिवसेना- श्रीनिवास वनगा, ८ हजार १९० मतं


पालघर अपडेट | शिवसेनेचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर


पालघर अपडेट  : राजेंद्र गावित पहिल्या स्थानी, तर बळीराम जाधव दुसऱ्या क्रमांकावर आहेत


पालघर अपडेट : विक्रमगडमध्ये माकप आघाडीवर (08.59 AM)


पालघर अपडेट :नालासोपाऱ्यात बळीराम जाधव आघाडीवर (08.58 AM)


पालघर अपडेट :पालघर श्रीनिवास वनगा आघाडीवर (8.55 AM)


पालघर अपडेट :बोईसरमध्ये शिवसेना हजार मतांनी आघाडीवर (08.30 AM)


पालघर तसेच भंडारा गोंदिया मतमोजणीत आधी पोस्टल मतांची मोजणी सुरू झाली आहे. (08.15 AM)


पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत लढत शिवसेनेचे श्रीनिवास वनगा आणि भाजपाचे राजेंद्र गावित यांच्यात तसेच बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव आणि काँग्रेसचे दामू शिंगडा यांच्यात आहे. तर भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार मधुकर कुकडे यांच्यात आणि भाजपाचे हेमंत पटले यांच्यात आहे. भाजपासाठी पालघर आणि भंडारा गोंदिया या दोनही जागा महत्वाच्या आहेत, कारण पालघरमधील जागा भाजपा खासदाराच्या निधनाने रिक्त झाली होती, तर भंडारा गोंदियात भाजपा खासदार नाना पटोले यांनी भाजपावर नाराज होत राजीनामा दिला होता, त्यामुळे दोन्ही जागा राखणे भाजपाला महत्वाचे आहे.


bhandara gondia bypoll results, palghar bypoll results, palghar results, bhandara gondia results