पालघरच्या मुरबे समुद्रकिनाऱ्याजवळ उभारणार बारमाही व्यापारी बंदर
Palghars Murbe Beach: या प्रस्तावाला महाराष्ट्र सागरी मंडळाने मान्यता दिली असून या बंदरामुळे सर्व प्रकारच्या मालाची आयात निर्यात करता येणार आहे.
Palghars Murbe Beach: पालघरमध्ये वाढवण बंदराच्या उभारणी संदर्भात वाद सुरू असतानाच आता याच बंदरांपासून अवघ्या पंधरा ते वीस किलोमीटरवर पालघर मध्येच आणखीन एक बंदर उभारले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. कसे असेल हे बंदर? ते कसे उभारले जाणार? यामुळे कोणाला होणार फायदा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पालघरच्या मुरबे समुद्रकिनाऱ्याजवळ बारमाही व्यापारी बंदराची उभारणी केली जाणार आहे . महाराष्ट्र सागरी मंडळाच्या परवानगी नंतर या बंदराच्या उभारणीची निविदा प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली असून जिंदाल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उच्छळी आणि सातपाटी खाडीदरम्यान मुरबे येथील उथळ आणि खडकाळ क्षेत्रावर भराव टाकून बंदर उभारण्याचे प्रस्तावित केले आहे.
या प्रस्तावाला 13 ऑक्टोंबर 2023 रोजी महाराष्ट्र सागरी मंडळाने मान्यता दिल्याची माहिती समोर आली असून या बंदरामुळे सर्व प्रकारच्या मालाची आयात निर्यात करता येणार आहे. 25 दशलक्ष टन प्रतिवर्षक क्षमता असलेल्या या प्रकल्पासाठी 4209 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.
यामध्ये संकल्पनात्मक योजना तयार करण्याबरोबरच बंदर क्षेत्र नौकानयन मार्ग आणि संबंधित सुविधा विकसित करणे , ब्रेक वॉटर बंधारा बांधणे तसच सुरक्षितपणे पर्यावरणीय दक्षता घेऊन बंदराला मालाची हाताळणी करण्याबाबतचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे आधीच जिल्ह्यात वाढवण बंदरा विरोधात स्थानिक आक्रमक असताना पुन्हा एकदा दुसरे बंदर प्रस्तावित असल्याने याझी झळ मच्छीमारांना बसणार असल्याच सांगत मच्छीमारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .
डहाणू बीच फेस्टिवलला सुरुवात
पालघरमध्ये डहाणू बीच फेस्टिवलला सुरुवात झाली असून दोन दिवस फेस्टिवल चालणार आहे. या बीच फेस्टिवलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमासह इतरही विविध कार्यक्रमांची मेजवानी पर्यटकांना अनुभवता मिळत असून खवय्यांना विविध खाद्य पदार्थांचाही आस्वाद लुटत आहेत. शिवाय समुद्रातील वॉटर स्पोर्ट्स सुद्धा या फेस्टिवलमध्ये अनुभवायला मिळतोय.
प्यारा सेलिंग
पर्यटकांसाठी विशेष आकर्षण असे असलेले प्यारा सेलिंग याचा सुद्धा पर्यटकांना आनंद घेत आहेत.या फेस्टिवल चे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम अन्न आणि नागरी पुरवठा व पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले .अशा फेस्टिवल मुळे डहाणूतील पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.