Pandharpu Water Cut :  उन्हाळ्यापूर्वीच महाराष्ट्रातील या शहरावर पाणी संकट ओढवल आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात मार्चपर्यंत पुरेल एवढ्याच पाणी साठा उपलब्ध असल्याचं नगरपालिकेचे म्हण आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून नगर पालिकेने शहरातील पाण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (pandhapur water cut news Water crisis on Pandharpurkar As there is only enough storage in Ujani Dam till March there will be water every other day from today)


पंढरपूरकरांनो पाणी जरा जपूनच वापरा! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा पाऊस कमी झाल्याने पहिलेच उजनी धरणात पाणी साठा कमी झाला होता. अशातच शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी कालव्यातून पाणी सोडण्यात आल आहे. उन्हाळ्यापूर्वीच या धरणातील पाणी साठा हा 4 टक्के एवढ्याच असल्याच समोर आल आहे. त्यात उजनी धरणातून भीमा नदीला कधी पाणी सोडणार याबाबत अद्याप वरिष्ठ पातळीवर निर्णय झालेला नाही. त्यामुळे मार्च अखेर पर्यंत शहराला पुरले इतका पाणी साठी बंधाऱ्यात आहे
त्यामुळे खबरदारी म्हणून नगरपालिकेने आजपासून शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.  या पाणी संकटाचा फटका सर्वसामान्यांसोबत पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बसणार आहे.