मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) पंढरपूर (Pandharpur)मध्ये २४ नोव्हेंबर रात्रीपासून २६ रात्री १२ पर्यंत कर्फ्यू राहणार आहे. या दरम्यान नागरिकांना संचारबंदी करण्यात आलीय. एसटी बस देखील थांबवण्यात आल्यायत. पोलीस प्रशासनाने हा आदेश जाहीर केलाय.


कोविड फोर्स तैनात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना काळात १०० पोलीस अधिकारी, १२०० कर्मचारी, एक एसआरपीएफचे यूनिट आणि ४०० होमगार्ड मिळून एकूण १७०० जण तैनात केले जाणार आहेत. पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे मंदिर असून २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान कार्तिक एकादशीचा शुभ मुहूर्त आहे.



श्रद्धेवर कोरोना संकट 


कार्तिकी एकादशीला देशातील विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अशावेळी कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता अधिक आहे. हे पाहता पोलीस प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलाय. 


पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे पश्चिम भारताच्या दक्षिण प्रांतात भीमा नदी किनारी आहे. विठ्ठल संप्रदायाचे महान संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा हे आहेत. इथे विठ्ठल रुपातील श्रीकृष्णाची पूजा होते.