पंढरपूर : पंढरपुरातल्या विठूरायाच्या चरणी बंगळुरूतल्या विठ्ठलभक्तानं ३७ लाखांचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केलाय. तब्बल ७३ तोळ्याचा हा हार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीनं दिलीय. बंगळुरूतले विठ्ठल भक्त असलेले एन. जी. राघवेंद्र आणि बिपीन जलाणी यांनी हा चंद्रहार अर्पण केलाय. या चंद्रहारावर लक्ष्मीची सुंदर प्रतिमा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं विठूरायाच्या गळ्यात हा हार घालण्यात आलाय. त्यामुळे चंद्रहार गळा कासे पितांबर असं मनमोहक विठ्ठलाचं रूप पाहण्याचा योग भाविकांना आला. 


तर दुसरीकडे त्रिपुरारी पौर्णिमा निमित्तानं विठ्ठल आणि रुख्मिणीचं मंदिर पुण्याचे भक्त राम जांभुळकर यांनी जर्बेराच्या फुलांनी सजवलीय. देवाचे हे रूप पाहण्यासाठी वारकऱ्यांनी मंदिरात मोठी गर्दी केली आहे.