आषाढीनिमित्ताने विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार, पण...
Pandharpur Government Vitthal Mahapuja : पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाली आहे. (Pandharpur Municipal Council Election Code of Conduct) त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाचे नियम पाळून महापूजा करावी लागणार आहे.
मुंबई : Pandharpur Government Vitthal Mahapuja : पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाली आहे. (Pandharpur Municipal Council Election Code of Conduct) त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाचे नियम पाळून महापूजा करावी लागणार आहे. त्यांना कोणतेही राजकीय कार्यक्रम घेता येणार नाही.
पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाचे नियम पाळून महापूजा करावी लागू शकते. याआधी कार्तिकी एकादशीवेळी तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नगरपालिका आचारसंहिता असताना कोणताही राजकीय कार्यक्रम न घेता महापूजा केली होती. त्याप्रमाणे आता मुख्यमंत्री शिंदे यांना करावे लागणार आहे.
कोरोना संकटानंतर आषाढी वारी सोहळा दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात पार पडत आहे. संत ज्ञानेश्वरांसह अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. पायी प्रवास पूर्ण करुन पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहचेल. तर 10 जुलैला आषाढी एकादशी साजरी होणार आहे.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पांडुरंगाची शासकीय महापूजा ही महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री करतात. ही शासकीय महापूजा असते.
एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर शासकीय महापूजेचा प्रश्नच सुटला आहे. पंढरपुरात यंदाची आषाढी एकादशीची पूजा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, त्यांना आचारसंहितेचे पालन करावे लागणार आहे.