Pandharpur Food Posioning: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरनगरीमध्ये लाखो भाविक दररोज विठूरायाचे दर्शन (Vithoba) घेण्यासाठी येतात. तेव्हा पंढरपूरच्या विठूरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी योग्य जेवणाची व्यवस्था करणे आवश्यक असते. परंतु नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आल्याचं पाहायला मिळाले आहे. पंढरपुराला दर्शनासाठी आलेल्या भक्तांना अन्नांतून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. भक्तदर्शनासाठी आलेल्या भाविकांना जेवल्यानंतर अचानक उलट्या आणि जुलाबाचा (food poisoning) त्रास होऊ लागला. (pandharpur news, pandharpur news food poisoning, pandharpur news today)


नक्की प्रकरण जाणून घ्या 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंढरपूर येथे देवदर्शनासाठी आलेल्या मुंबई येथील सुमारे 30 पेक्षा अधिक नागरिकांना जेवणातून विषबाधा झाली आहे. चंद्रभागा नदीकाठच्या असणाऱ्या अन्नपूर्णा भोजनालय व हॉटेल परब्रम्ह या दोन्ही ठिकाणी हे भाविक जेवले होते. जेवणानंतर या भाविकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात (private hospital) उपचार सुरू आहेत. अन्न औषध प्रशासन विभागाचे या सगळ्या बाबींकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते. या घडल्याप्रकारामुळे पुन्हा एकदा भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे. 


इथे आलेल्या एका भाविकांनी असं सांगितले की, आम्ही येथे सहकुटुंब सहपरिवार (pandharpur darshan) पंढरपूरच्या दर्शनासाठी आलो होतो. अक्कलकोट, तूळजापूर आणि पंढरपूरसारख्या ठिकाणी आम्ही सगळेच दर्शनासाठी आलो होतो. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही सगळे जेवायला गेलो होतो. ज्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो होतो तिथून बाहेर पडल्यानंतर काही लोकांना डिसेन्ट्रीचा त्रास सुरू झाला यामुळे आम्ही सगळेच घाबरलो आणि तातडीनं सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये (hospital) एडमिट केले. सध्या या प्रकारानं भाविक घाबरले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.