पंढरपूर : मराठा समाजाने आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन पुकारले आहे. आंदोलनादरम्यान एसटीलाच लक्ष्य केलं जात असल्याने पंढरपूर आगारातून ग्रामीण भागातील वाहतूक पाच दिवसापासून बंद आहे.आंदोलन काळातील पंधरा दिवसांमध्ये पंढरपुरातील आंदोलकांनी जवळपास ४० एसटी बस फोडल्या. दोन एसटी बस जाळण्याचाही प्रयत्न झाला.


पोलीस संरक्षणाची मागणी 


आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आगारातून  २१  ग्रामीण मार्गावरून होणारी एसटीची वाहतूक पाच दिवसांपासून बंद आहे. दिवसभरातील जवळपास शंभर एसटी फे-या दगडफेकीच्या भीतीने बंद आहेत. पोलीस संरक्षण मिळत नसल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आल्याचे आगार प्रमुखांनी सांगितलं.