Vitthal Mandir Basement: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक तळघर सापडल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे या तळघरात काय काय असेल याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. दरम्यान तळघरात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली.यानंतर महत्वाची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंढरपूर विठ्ठल मंदिरातील गाभा-यासमोरील तळघर उघडण्यात आलंय.पुरातत्त्व विभागाच्या अधिका-यांनी या तळघरात पाहणी केली. या तळघरातून मूर्ती आणि पादुका सापडल्या आहेत.तर विष्णुबालाजीरुपातील 3 ते 4 फूट उंची असलेली मूर्ती सापडलीये.पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने आणि वास्तू विशारद तेजस्विनी आफळे हे तळघर उघडून आत गेले होते.त्यांना भग्नमूर्ती आणि पादुका आढळल्या त्या त्यांनी बाहेर काढल्या आहेत.


विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ हा दरवाजा सापडला. त्यात प्रवेश केला असता काही बांगड्याचे तुकडे, तसेच काही नाणी सापडल्याचे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी सांगितले. एक खोली सदृश्य वास्तू आढळल्याचे समजले. एक 6 बाय 6 फुटाचे चेंबर आहे. येथे एकूण 6 वस्तू आढळल्या. मातीच्या बांगड्या येथे सापडल्या. तसेच दगडाच्या मुर्त्या सापडल्या. हे तळघर आतून बंदीस्त आहे. त्या पलिकडे काही असेल असे वाटत नाही. तरी याचा तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 


दोन मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तर 1 मुर्ती चांगल्या स्थितीत आहे. पण या मुर्तीची स्वच्छता केल्यानंतर या मुर्ती कोणत्या देवाच्या आहेत किंवा अन्य कसल्या आहेत हे कळणार आहे. या वस्तू पाहिल्या तर साधारण शंभर वर्षांपुर्वीच्या असू शकतात असा अंदाज लावला जात आहे. पुरातत्व विभागाच्या संशोधनात हे समोर येऊ शकणार आहे.