सोलापूर : pandharpur : पंढरपूरला विठ्ठल मंदिरामुळे महत्व प्राप्त झाले आहे. आता विठ्ठल मंदिराला (vitthal mandir temple)मिळणार 700 वर्षांपूर्वीचं वैभव मिळणार आहे. (pandharpur vitthal mandir temple) सर्वकष आराखड्याला मंदिर समितीची मंजुरी दिले आहे. त्यामुळे आता येथील रुपडे पालटणार आहे. अंतिम मंजुरीसाठी आराखडा सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. सर्वंकष आराखड्यासाठी 61 कोटी 50 लाखांची मागणी करण्यात आली आहे. (pandharpur vitthal  temple will get the look of 700 years ago)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नव्या आराखड्याची 5 टप्प्यांत विभागणी करण्यात आली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला 700 वर्षांपूर्वीचे मूळ स्वरूप देण्यासाठी पुरातत्व विभागाने तयार केलेला आराखडा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला प्राप्त झाला आहे. मंदिर समितीनं नुकतीच या आराखडय़ाला मंजुरी दिली आहे. 


अंतिम मंजुरीसाठी हा आराखडा राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे आठवडाभरात पाठवण्यात येणारेय. या सर्वंकष आराखडयासाठी 61 कोटी 50 लाखांची मागणी करण्यात आलीय. या आराखडयाची 5 टप्प्यांत विभागणी करण्यात आली आहे. 


दरवर्षी लाखो भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. येत्या काळात भाविकांना विठूरायाचं आगळवेगळे मंदिर पाहता येणार आहे. या मंदिराला 700 वर्षांपूर्वीचं मूळ रूप दिले जाणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून पुरातत्व विभाग त्यावर काम करत होते. त्याला आता मूर्तस्वरुप मिळाले आहे.