शेगांवच्या गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना
....
शेगाव: 'गण गण गणात बोते ' च्या गजरात शेगांवच्या गजानन महाराजांची पालखी आज (मंगळवार, १९ जून) आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली. महाराजांच्या पालखीचे हे ५१ वे वर्ष असून ६५० वारकरी घेऊन ही पालखी निघालीय.. ७५० किमीचा पायी प्रवास करून ६ जिल्ह्यांमधून ही पालखी जातेय .. २१ जुलैला पालखी पंढरपूरला पोहचेल., .. ६ दिवस मुक्काम करून पालखी परत शेगावला मार्गस्थ होणार आहे... संस्थानचे अध्यक्ष शिवशंकर पाटील यांच्या हस्ते पूजन होऊन पालखी सकाळी निघाली. वारकऱ्यांना संस्थानच्या वतीने सर्व सुविधा दिल्या जातात.