पंढरपूर : राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्येला तोंड द्यावं लागतंय. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जगणं मुश्कील झालं आहे. 'पुन्हा शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणार नाही', असं म्हणत एका तरुण शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील सुरज जाधव या तरुण शेतकऱ्याने चित्रफित तयार केली. त्यात तो म्हणतो की, 'शेतकऱ्याच्या जन्माला आपण परत कधीच येणार नाही. आपलं आयुष्य इथ पर्यंतच होत. इथून पुढे आयुष्य नाही. शेतकरी नामर्द आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या जन्माला आपण येणार नाही. सरकार कधी शेतकऱ्याच्या कधी नादाला लागत नाही. सरकार शेतकऱ्याचा कधी विचार करत नाही. 


ही चित्रफित केल्यानंतर सुरजने विष प्राशन करून आत्महत्या केली. उपचारा दरम्यान पंढरपूरच्या सामान्य रुग्णालयात झाला मृत्यू झाला.