Pankaja Munde Bhagwan Gad: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे दसऱ्यानिमित्ताचे भाषण थोड्याच वेळात भगवान गडावर होणार आहे. पण या भाषणाअगोदरच सभास्थळी गोंधळ झाला आहे. सावरगाव येथे भगवान भक्ती गडावर होत असलेल्या पंकजा मुंडे यांच्या सभेअगोदर गोंधळ निर्माण झाला आहे. 


काहीजण गोंधळ घालण्यासाठी आले आहेत का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात येत आहे. गोंधळ घालणाऱ्यांना समज देण्यासाठी पोलीस सभेमध्ये पोहोचले आहेत. दरम्यान बसायला जागा न मिळाल्यावरुन कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे सांगण्यात येत आहे. थोड्याच वेळात पंकजा मुंडे येथे उपस्थित होतील. त्या यावर काय भाष्य करतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.