लातूर : गोपीनाथ मुंडे यांनी काही केलं की ते प्रसिद्ध होत असे. तसंच आपण राज्यात मंत्री म्हणून काहीही काम केलं तरी ते प्रसिद्ध होत असल्याचा दावा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जलसंपदा खात्याची मंत्री असताना जलयुक्त शिवारचे यशस्वी काम केल्यामुळे जलयुक्त शिवार म्हणून ओळखले जाते. तर ग्रामविकास खात्याचा मूलभूत सुविधांसाठी असलेला २५-१५ च्या निधीचे मोठ्या प्रमाणात वाटप केल्यामुळे जनता आपल्याला '२५-१५ मंत्री' म्हणून ओळखते असा दावाही पंकजा मुंडेंना केलाय. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इथे त्या बोलत होत्या.