बुलेट ट्रेनपेक्षाही फास्ट पंकजा मुंडेंची स्वच्छता!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत बीड जिल्हा भाजपनं जिल्हा रुग्णालयात स्वच्छता अभियान राबवलं.
बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत बीड जिल्हा भाजपनं जिल्हा रुग्णालयात स्वच्छता अभियान राबवलं. सकाळी ११ वाजता येणाऱ्या पालकमंत्री पंकजा मुंडे या कार्यक्रमाला तब्बल साडेतीन तास उशीरा आल्या.
स्वच्छता अभियानासाठी गाडीतून खाली उतरताच पंकजा मुंडे पाच मिनिटांमध्ये स्वच्छता करून त्या निघून गेल्या. पंकजा मुंडे निघून गेल्यावर राहिलेले कार्यकर्तेही निघून गेले. आणि मागे राहिला तो फक्त कचरा. अशा प्रकारे बीड जिल्हा भाजपनं मोदींचा आदेश पाळत स्वच्छता अभियान राबवलं. पंकजा मुंडेच्या या बुलेट ट्रेन पेक्षाही फास्ट स्वच्छता अभियानाची बीडमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.