बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घरफोड्यांचा पक्ष आहे. आम्ही घरफोडण्याचे काम करीत नाही, अशी घणाघाती टीका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. घर फुटल्यानंतर किती वेदना होतात हे भोगले असल्याचे पंकजा यावेळी म्हणाल्या. बीडच्या मेळावा सभेत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. राष्ट्रवादीने क्षीरसागर यांचे घर फोडले. आम्ही कोणाचे घर फोडण्याचे काम केलेले नाही. मात्र जेव्हा क्षीरसागर यांचे घर फोडले तेव्हा आपल्याला त्रास झाला, असे त्या म्हणाल्या.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा घरफोड्या पक्ष आहे. घराघरात भांडण लावण्याचे काम त्यांनी नेहमीच केली आहेत. क्षीरसागर यांच्या घरात सुद्धा भांडण लावण्याचे काम त्यांनी केले आहे. सत्तेसाठी हे लोक काहीही  करू शकतात. आम्ही मात्र कोणाचे घर फोडण्याचा काम केले नाही, घर फुटल्यानंतर किती वेदना होतात यातून मी गेले आहे, असेही त्या म्हणाल्या.