Pankaja Munde Dasara Melava 2024: ...मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ. बीडमधील दसरा मेळाव्याची सुरुवात पंकजा मुंडे यांनी एका शायरीने केली. त्या ठिकाणी एक मुस्लीम बांधव मुंडे साहेबांचा फोटो घेऊन नाचतोय. मुंडे साहेबांनी दिलेला शब्द आज मी खरा करून दाखवला आहे. मी भगवान भक्तीगड उभा केलाय. कळालं, मी महाराष्ट्राची वाघीण आहे! आता शांत बसा. तसेच या दसरा मेळाव्याला उपस्थित असलेले मंत्री धनंजय मुंडे म्हणजेच 'माझा धनु भाऊ'. त्याबरोबर या ठिकाणी माझी बहिण देखील उपस्थित आहे. तसेच माझा मुलगा आर्यमन देखील भगवानबाबांच्या दर्शनाला आलाय.  माझा मुलगा आर्यमानपेक्षा ही जनता मला जास्त प्रिय आहे. पोटच्या लेकरापेक्षा मी तुमच्यावर माया करते. माझ्या निवडणुकीच्या निकालानंतर काही लेकरांनी जीव दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लक्ष्मण हाके गोंडस लेकरू, पंकजा मुंडेंकडून उल्लेख


भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्यासाठी आलेल्या लक्ष्मण हाके यांचा पंकजा मुंडे यांनी गोंडस लेकरू असा उल्लेख केला आहे. माझ्या मेळाव्याचं मी कुणाला निमंत्रण देत नाही. माझा सन्मान ठेवून आलेल्या लक्ष्मण हाके यांचं मी स्वागत करते. येथे आलेले 18 जातीचे बांधव तुम्हाला मी दरवर्षी साष्टांग दंडवत घालते. का घालते? कारण माध्या वडिलांनी मरताना माझ्या झोळीमध्ये तुमची जबाबदारी टाकली आहे. तुम्ही मी जिंकल्यावर देखील इज्जत दिली आणि मी हरल्यानंतर देखील तु्म्ही जास्त इज्जत दिली. त्यामुळे आता मी तुम्हा सर्वांना इज्जत देण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक गावा-गावात कानाकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. 


'आपल्याला आपला डाव खेळायचाय'


महाराष्ट्राच्या प्रत्येक गावा-गावात जावून मी दौरा करणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा आहे की नाही? असा देखील सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे. पंकजा मुंडे खोटे बोलते का? उजेडात एक आणि अंधारात एक असं वागते का? आणि कुणाला घाबरते का? कुणालाही घाबरत नाही. फक्त घाबरते जर या पुढच्या मैदानात माझे भाषण ऐकण्यासाठी लोक नसतील तेव्हा. मी भगवान बाबांना प्राथर्ना करेन की असा दिवस येऊ देऊ नका. 


तुमच्यासाठी भांडायचं आहे. तुम्हाला विमा मिळावा, तुमच्या शेतीच्या भावाला चांगला दर मिळावा. तुमच्या गावापर्यंत रस्ते मिळवून देयचे आहेत. शाळा आणि शिक्षण यासोबत अनेक गोष्टी करायच्या आहेत. मंत्री असताना सर्व गोष्टी केल्या. न मागता रस्ते दिले. न मागता या जिल्ह्याला सर्व काही दिले. बीड जिल्ह्यातील प्रत्येकासाठी मी कामं केलं. निधीबाबत कधीच भेदभाव केला नाही.