Panvel Karjat Railway Line in Marathi : मुंबईकरांचा आता लांबचा प्रवास पण सुसाट आणि सोयीस्कर होणार आहे. कारण आता मुंबईकरांना पनवेलहून थेट कर्जत गाठता येणार आहे. दरम्यान ठाणे-दिवा नवीन पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर आता लवकरच पनवेल ते कर्जत अशी लोकल ट्रेन सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे काम सुरू असून या प्रकल्पातील सर्वात मोठा वावर्ले बोगद्याचे 90 टक्के पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर तीन हजार 144 मीटर लांबीच्या पुलाचे 80 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प 3 (MUTP 3) अंतर्गत पनवेल ते कर्जत हा दुहेरी रेल्वे मार्गाचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पनवेल-कर्जत दरम्यान एकच रेल्वे मार्गिका असून त्यावरुन लांब पल्ल्याच्या गाड्या किंवा मालवाहतुकीसाठी होत आहे. कर्जत आणि पनवेलमधील प्रवाशांना ठाणे किंवा कुर्लाला वळसा घालून प्रवास करावा लागतो. जर पनवेल-कर्जत अशी थेट लोकल सुरु झाली तर त्याचा फायदा अनेक प्रवाशांना होऊ शकतो.  लोकल ट्रेन सुरू झाल्यास त्याचा अनेक प्रवाशांना फायदा होऊ शकतो. त्यासाठी येथे नवीन उपनगरीय मार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि एमयूटीपी-3 अंतर्गत एमआरव्हीसी या मार्गाचे काम हाती घेतले. त्यामुळे येत्या काही वर्षांत पनवेल ते कर्जत या मार्गावर लोकल धावणार आहेत. 


असा असेल मार्ग


या दुहेरी मार्गामुळे पनवेल ते कर्जत दरम्यान राहणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. पनवेल, चौक, मोहपे, चिखले, कर्जत अशी पाच स्थानके असतील. याशिवाय फलाट, पादचारी पूल, भुयारी मार्ग आदी कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहेत. 3.12 किलोमीटरच्या तीन रेल्वे बोगी असतील. 56 किमी लांबीच्या दुहेरी रेल्वे मार्गावर पाच उड्डाणपूल, दोन रेल्वे उड्डाणपूल, सहा मुख्य पूल आणि 37 छोटे पूल असतील.


या मार्गावर नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे उभारण्यात येणार आहेत. वावर्ले बोगदा पूर्ण झाल्यावर हा मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा असेल. तसेच पनवेल ते कर्जत लोकल 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.