परभणी : परभणीत दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाचा ताफा पेडगावच्या शेतकऱ्यांनी मानवत रोडवरील रेल्वे फाटकावर रोखला. परभणी तालुक्यातील पेडगावमधल्या शेतीचं हे केंद्रीय पथक पाहणी करणार होतं. पण पेडगाव हे गाव सेलू मानवत मार्गे बीडकडे जाणाऱ्या मार्गावर नसल्यानं पेडगावचा दौरा पथकानं रद्द केला होता. सेलू तालुक्यातील गणेशपूर इथल्या त्रिवेणी गीते यांच्या शेताची पाहणी करून पथक मानवत तालुक्यातील रुडी गावाकडे निघाले होते त्यावेळी हा प्रसंग घडला.


पथकाने ताफा वळवला 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मानवत रोडवर रेल्वे फाटक लागले आणि ताफा थांबला होता. यावेळी पेडगावच्या शेतकऱ्यांनी गाडी समोर उभी करुन केंद्रीय पथकाला 'आमची स्थिती पहा असा दौरा रद्द करू नका' म्हणून अट्टहास केला.


याच गाडीत परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिबशंकर समोरच्या सीटवर बसले होते.


ते शेतकऱ्यांच्या व्यथा मराठीतून पथकाला हिंदीत अनुवादित करून सांगत होते.


शेतकऱ्यांचा अट्टाहास बघून पथकाने आपला ताफा पेडगावकडे वळवला.