औरंगाबाद : शासकीय रुग्णालयातला स्टाफ खूश आहे, कारण या बाळाची आई अखेर त्याला मिळाली आहे. मात्र या आनंदाआधी या बाळानं गेली 21 दिवस आपल्या आईवडिलांचा विरह सहन केलाय. बीडमधल्या एका हॉस्पिटलमध्ये या मुलीचा जन्म झाला असताना, एका नर्सच्या चुकीमुळे मुलगा झाल्याचं पालकांना सांगण्यात आलं. म्हणून पालकांनी आपल्याच हाडामासाच्या या लहानगीला स्वीकारायला नकार दिला होता. अशा परिस्थितीत अत्यंत अशक्त झालेल्या या बाळाला पोलीस औरंगाबाद शासकीय रुग्णालयात घेऊन आले. इथे अनामिक यशोदांनी या बाळाला आपलं दूध दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेर औरंगाबाद पोलीस आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं बाळाची डीएनए चाचणी करण्यात आली. त्यात या बाळाला नाकारणारे पालकच तिचे जन्मदाते असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर औरंगाबादमध्ये येऊन आनंदाने त्यांनी या बाळाचा स्वीकार केला. 


दरम्यान डीएनए चाचणीनंतर शुक्रवारी औरंगाबादमध्ये पोलिसांकडून बाळाचा ताबा घेतलेल्या थिते दाम्पत्यानं, बिडमध्ये येऊन पुन्हा एकदा हे बाळ स्वीकारायला नकार दिलाय. आता बीडमधल्या बालकल्याण समितीनं या बाळाचं पालकत्व स्वीकारत, हे बाळ औरंगाबादमधल्या एका सामाजिक संस्थेच्या ताब्यात दिलंय.