JaiBhim : अनोखी मानवंदना! घरावर उभारला Bharat Ratna डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा
दौंड तालुक्यातील पारगाव येथील माजी सरपंच राजेंद्र विष्णू शिशुपाल यांनी नव्याने बांधलेल्या स्वतःच्या दुमजली घराला ``क्रांतिसूर्य`` नाव दिले आहे. याच घराच्या टेरेसवर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा फूट उंचीचा पुतळा उभारला आहे.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : Bharat Ratna डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महानिर्वाणदिन आहे. मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर या महामानवाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठा जनसागर उसळला आहे. पुण्यातील एका प्राध्यापकाने आंबेडकर यांना अनोखी मानवंदना दिली आहे. यांनी थेट आपल्या घरावरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारला आहे.
दौंड तालुक्यातील पारगाव येथील माजी सरपंच राजेंद्र विष्णू शिशुपाल यांनी नव्याने बांधलेल्या स्वतःच्या दुमजली घराला ''क्रांतिसूर्य'' नाव दिले आहे. याच घराच्या टेरेसवर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा फूट उंचीचा पुतळा उभारला आहे.
सोनेरी रंगाचा, अंगावर कोट, पॅन्ट, हातात पुस्तक आणि चष्मा अशा वेशभूषेतील हा पुतळा आंबेडकर यांची हुबेहूब प्रतिकृती दिसत आहे. पुणे येथील एका कारागिराकडून त्यांनी हा पुतळा बनवून घेतल्याचे सांगितले. हा पुतळा उभारणीसाठी किती खर्च आला याबाबत ते कधीही लोकांना सांगत नाहीत. कारण या मानवाची किंमत पैशात होऊच शकत नाही असे शिशुपाल म्हणातत. आंबेडकरांचा विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी ही कलाकृती उभारली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हंटल की आपल्या अंगात एक सकारात्मक ऊर्जा संचारते अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.