बीड : परळी इथंल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये अचानक स्फोट झाल्यानं भाजलेल्या चौघांचा मृत्यू झालाय. तर चार जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.


उकळलेला रस अंगावर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या उसाच्या रसात भरलेल्या टाकीने टाकीचे केस गळून पडले. साखर प्रक्रियेसाठी हा रस दुसऱ्या टाकीत नेण्यापूर्वीच गरम रसाने ही टाकी फुटल्याने कर्मचाऱ्याच्या अंगावर उकळलेला रस पडला. त्यामध्ये एकूण ११ कर्मचारी भाजले होते.


दरम्यान, जखमींवर लातूरच्या लहाने हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेला हा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मागच्या वर्षी बंद होता. यंदा गेल्या महिन्यात कारखान्याचा गाळप हंगाम सुरु झाला.


दरम्यान, ऊसाच्या रसाच्या टाकीचा अचानक स्फोट झाला. गरम रसामुळे वाफ साचल्यानं स्फोट झाल्याचा अंदाज आहे.