परतूर : जालना जिल्ह्यातील परतूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी महिला तहसीलदार रुपा चित्रक यांचा उल्लेख 'हिरॉईन' असा केला होता. हिरॉईन शब्दाचा अर्थ डॅशिंग महिला असा अभिप्रेत होता अशी त्यांनी सारवासारव करुन या वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. राज्यभरातून लोणीकर यांच्यावर टीकेची झोड उडाली आहे. दरम्यान परतुरच्या तहसीलदार रुपा चित्रक सुट्टीवर गेल्याचे वृत्त आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तहसीलदार रुपा चित्रक या तब्बेत ठीक नसल्याचं कारण देत सुट्टीवर गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नाराज असल्याने त्यांनी सुट्टी घेतली की लोणीकरांच्या वक्तव्याची अधिक चर्चा होऊ नये म्हणून त्यांना सुट्टीवर पाठवण्यात आले ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.



वादग्रस्त विधान 


हेक्टरी 25 हजार रुपये अनुदान पाहिजे असेल तर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा  परतुरला करायचा का ? तुम्ही ठराव सगळ्याच सरपंचांनी आपल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजे. जिल्हा परिषद सदस्य, प.समिती सदस्य सगळ्यांनी ताकद जर लावली तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोर्चा होऊ शकतो.


अधिवेशनाच्या आधी जर मोर्चा झाला पंचवीस हजार लोक आले, पन्नास हजार लोक आले. तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीसला आणा, तुम्ही सांगा चंद्रकांत दादा पाटलाला आणा, तुम्ही सांगा सुधीर भाऊला आणा, तुम्ही सांगा कुणाला आणायचं, तुम्हाला वाटलं तर सांगा नाही तर मंग एखादी 'हिरोइन' आणायची तर 'हिरोइन' आणा, नाही कुणी भेटलं तर तहसीलदार मॅडम हिरोइन आहेच. त्या निवेदन घ्यायला येईल तुमचं...


वक्तव्याचं भांडवल


विरोधकांनी माझ्या वक्तव्याचं भांडवल केल्याचा आरोप यावेळी लोणीकरांनी केला. विरोधकांनी गुगलवर जाऊन हिरॉईन या शब्दाचा अर्थ तपासावा असंही त्यांनी सांगितले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना गुगलच्या सर्च इंजिनवर जाऊन 'हिरॉईन' या शब्दाचा अर्थ काढणारे व्हिडीओ दाखवले. 


टॉप हेडलाईन्स


भरचौकात शिक्षिकेला जाळलं, घटनेविरोधात विद्यार्थिनींचा आक्रोश


कोरोना व्हायरसची ज्याला लागण झाली त्याचा मृत्यू अटळ?


लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अफलातून अभिनय,विनोदाचं टायमिंग एकदा पाहाच....


लोणीकरांनी 'हिरॉईन' उल्लेख केलेल्या महिला तहसीलदार सुट्टीवर


कुणाल कामरा राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर