पुतळा दहनावेळी कार्यकर्त्याची पॅण्ट पेटली
कोल्हापुरात राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करताना आज चक्क एकाच्या पॅण्टनं पेट घेतला.
कोल्हापूर : कोल्हापुरात राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करताना आज चक्क एकाच्या पॅण्टनं पेट घेतला. काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं हे आंदोलन केलं. त्यावेळी प्रतिकात्मक पुतळा पेटवल्यानंतर चक्क विशाल शिराळकर या कार्यकर्त्याच्या पॅण्टनं पेट घेतला.
इतर कार्यकर्त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. अखेर या कार्यकर्त्यानं आपली पॅण्ट काढून टाकली. मात्र तत्पुर्वी त्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली होती. एखाद्याच्या विरोधात आंदोलन जरूर करा, मात्र हे करत असताना स्वतःला काही इजा होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.