पिंपरी चिंचवड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात केवळ २१.२२ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पाऊस न पडल्यास पिंपरी चिंचवडकरांच्या तोंडचं पाणी पळण्याची शक्यता आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा १ मे पासून शहरात एकदिवसाआड पाणी देत २५% पाणी कपात करण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यात धरणातल्या पाण्याची पातळी ३५ टक्क्यांवरून २१.२२ टक्क्यांवर आली आहे. १ जून पासून धरणक्षेत्र परिसरात अवघ्या ९२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाणीसाठा शहराला केवळ ४५ दिवस पुरणार आहे.