मुंबई : Corona कोरोनाचं वाढतं थैमान पाहता सार्वजनिक प्रवासाच्या सुविधा टाळण्याला आता अनेकांनी सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गर्दीचं प्रमाण टाळण्यासाठी म्हणून नागरिक शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. परिणामी बसने प्रवास करणाऱ्यांचा संख्येत विलक्षण घट झाली आहे. मुंबईतही बेस्ट बसमध्ये प्रवाशांनी संख्या ही लक्षणीयरित्या घटल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी महामंडळालाही कोरोना व्हायरच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका बसत आहे. परिणामी महामंडळाची वाहनं अर्थात प्रवाशांध्ये प्रसिद्ध असणारी ही 'लाल परी'ही कोरोनाने प्रभावित झाली आहे असं म्हणावं लागेल. 


देशात आणि राज्यातही कोरोना व्हायरसची प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात धास्ती घेतली आहे. नाशिकवरून पुण्याला जाणाऱ्या बहुतांश बसमध्ये फक्त २ ते ३ प्रवासीच दिसू लागले आहेत. तर, स्थानिक बस सेवांव्यतिरिक्त राज्य परिवहन महामंडळाला कोरोनाचा मोठा फटका बसत आहे. 


मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्यांची संख्याही घटली आहे. तर, नाशिकच्या बसस्थानकावर पुण्याला जाणारे प्रवासी मिळेनासे झाले आहेत. पण, पुण्यावरून नाशिकला येणाऱ्या प्रवाशांची संख्या मात्र जास्त असल्याचं कळत आहे. प्रवाशांनी सध्याच्या घडीला सावधगिरी बाळगत लाल परीकडे फिरवलेली पाठ पाहता, इंधनाचा खर्चही सुटणार नसल्यानं एस टी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. 



पाहा, कोरोनाच्या दहशतीत इटलीमध्ये असा सुरु आहे जगण्याचा 'सुरेल' संघर्ष


फक्त एसटी महामंडळ आणि बेस्ट बसची सेवाच नव्हे, तर खासगी वाहनांचीही संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. रस्त्यांवरुही जाता-येता बहुतांश नागरिकांनी मास्क लावत प्राथमिक स्तरावर प्रतिबंधात्मक उपाय केल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरच कोरोनामुळे प्रवाशांनी उचललेलं हे पाऊल पाहता बेस्ट, रेल्वे, एसटी महामंडळाला याचा फटका बसत आहे.