नागपूर : पंतप्रधानांच्या राममंदिराबाबत या विधानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सूचक प्रतिक्रिया दिली आहे. राममंदिर व्हावे, अशी सत्तेत बसलेल्यांसह तमाम देशवासियांची इच्छा आहे. राम मंदिरासाठी तातडीने कायदा करावा, या मागणीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठाम आहे. त्यामुळे पुढे काय होतेय ते बघुयात असे संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी म्हटले आहे. मोदींच्या या विधानावर अयोध्येतील संतांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असतानाच बाबरी मशिद प्रकरणातील एक याचिकाकर्ते जफरयाब जिलानी यांनी मोदींना आता उपरती झाल्याचा टोला लगावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या विशेष मुलाखतीत विरोधकांवर जोरदार सर्जिकल स्ट्राइक केला. एवढंच नव्हे तर विविध प्रश्नांवर प्रदीर्घ उत्तरं दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायालयीन प्रक्रियेनंतरच राममंदिराबाबत अध्यादेश काढायचा की कसे, याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे आपल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.



कर्जमाफीचा फायदा मर्यादित शेतकऱ्यांनाच होतो, असंही ते म्हणाले. नोटाबंदी हा धक्का नाही. काळ्या पैशाबाबत वर्षभरापासून इशारे दिले होते. काळा पैसा अर्थव्यवस्थेत आणल्याचा दावाही त्यांनी केला. काँग्रेस नेतृत्वावरही त्यांनी घणाघाती टीका केली.



तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या टीकेलाही उत्तर दिलंय. काही मित्रपक्षांचा दबाव टाकण्याचा स्वभाव असतो, असं सांगत सगळ्या मित्रपक्षांना सोबत घेऊन पुढं जाणार, असं मोदींनी सांगितलं.