वर्ध्यात पुलावरुन गाडी कोसळली, 13 लोक गंभीर जखमी, पाहा व्हिडीओ
वर्ध्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथे एका चार चाकी गाडी पुलावरुन खाली पडली आहे.
वर्धा : वर्ध्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथे एका चार चाकी बस पुलावरुन खाली पडली, ज्यामुळे प्रवाशी गंभीर जखमी असल्याचे सांगणात येत आहे. खरंतर ही घटना वर्ध्यामधील बाभूळगाव इथील पुलावरून जात असताना ही घटना घडली आहे. ही घटना घडली तेव्ही गाडीत 13 प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये 13 ही प्रवासी गंभीररित्या जखमी झाल्याचे देखील सांगणायत येत आहे.
असे सांगण्यात येत आहे की, ही गाडी वाकी येथून दर्शन घेऊन परत येत होती. परंतु त्यादरम्यान या सगळ्यांवरती काळाने घात केला. या गाडीमधील 13 प्रवासी गंभीर जखमी झाले असले तरी, यामधील ड्रायव्हर आणि 2 वर्षांच्या चिमुकलीची परिस्थीती गंभीर असल्याचे सांगितले गेले आहे.
ही घटना कशी घडली या मागचे कारण अस्पष्ट आहे.