Petrol Diesel Price Today : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी बातमी, जाणून घ्या आजचा भाव
Petrol Diesel Rate in Marathi : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सामान्यांना मोठा दिलासा देणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करणार आहे.
Petrol Diesel Price on 30 December 2023 : गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल डिझेलचे दर दीर्घकाळापासून कायम आहेत. आता पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यासाठी पेट्रोलियम आणि अर्थ मंत्रालय चर्चा करत आहेत. याशिवाय तेल कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर 8 ते 10 रुपयांनी स्वस्त होऊ शकतात. जर तुम्ही गाडीची टाकी फुल्ल करणार असाल तर आधी पेट्रोल आणि डिझेलचे आजचे नवे दर जाणून घ्या...
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नेहमीच बदलतात. मात्र मिळालेल्या माहितीनुसार नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी घट होण्याची शक्यता आहे. यामध्ये तेलाच्या किमतीचा भाव एक ते दहा रुपयांनी कमी होऊ शकतात. मागील वर्षभरात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज, 30 डिसेंबर सकाळी WTI क्रूडच्या किंमतीत मोठी घसरण झाली तर प्रति बॅरल किंमत $74.06 आहे. ब्रेंट क्रूड 1.42 डॉलरने घसरले असून प्रति बॅरल 79.65 डॉलरवर पोहोचले आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत.
महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर
मुंबईत पेट्रोल 106.21 रुपये आणि डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर
पुण्यात पेट्रोल 106.22 रुपये आणि डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर
ठाण्यात पेट्रोल 105.97 रुपये आणि डिझेल 92.46 रुपये प्रति लिटर
नाशिक पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.10 रुपये आणि डिझेल 92.65 रुपये प्रति लिटर
इतर शहरांमधील पेट्रोल डिझेलचे दर
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 86.62 रुपये प्रति लिटर
कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
अशा प्रकारे जाणून घ्या नवे दर
पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर तुम्हाला एसएमएसद्वारेच कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 वर मजकूर पाठवून RSP आणि त्यांच्या शहर कोडबद्दल माहिती मिळवू शकतात. जर तुम्ही BPCL ग्राहक असाल तर RSP शहर कोड टाइप करून आणि 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. आता, HPCL ग्राहक 9222201122 वर मजकूर पाठवून HPPprice आणि त्यांचा शहर कोड जाणून घेऊ शकतात.