Today Petrol Diesel Price : अनेक बाजूंनी महागाईचा तडाखा सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel rate) दरात 10 रुपयांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे. यावर सरकारी तेल कंपन्या दर कमी करण्याचा विचार करत आहेत. दरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी झाल्यास एकंदरीत महागाईला आळा बसण्यास मदत होणार असून त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे.  


एप्रिल 2022 पासून पेट्रोल डिझेलचे दर जैसे थे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी रिटेल विक्रेत्या कंपन्यांनी एप्रिल 2022 नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. आता कंपन्यांनी किमतींचा आढावा घेण्याचे संकेत दिले आहेत. संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे की, ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून (OMCs) मिळणाऱ्या प्रति लिटर 10 रुपयांच्या मार्जिनमध्ये कपात करून हा फायदा ग्राहकांना दिला जाऊ शकतो. 


तेल कंपन्यांना नफा


आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या सहामाहीत तीन तेल कंपन्या (OMCs) मजबूत नफा कमावत आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 4,917 टक्के वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवरील उच्च मार्जिनमुळे, 2023-24 आर्थिक वर्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत कंपन्यांनी प्रचंड नफा कमावला आहे. हाच कल तिसऱ्या तिमाहीत दिसून येण्याची शक्यता आहे. महिनाअखेरीस या कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 5 ते 10 रुपयांनी कमी करतील, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येतं आहे. 


महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल


भारतीय तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अचानक बदल झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी 7 वाजता डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल 76.38 डॉलरवर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $81.76 वर व्यापार करत आहे. देशातील काही राज्यांमध्ये कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली असून महाराष्ट्रात पेट्रोल 25 पैशांनी तर डिझेल 24 पैशांनी स्वस्त झालं आहे. 


इतर शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती


मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.


पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.17 रुपये तर डिझेलचा दर 92.68 रुपये प्रतिलिटर 


नाशिकमध्ये पेट्रोल 106.54 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 93.05 रुपये प्रतिलिटर 


नागपुरात पेट्रोलचा दर 106.28 रुपये तर डिझेलचा दर 92.82 रुपये प्रतिलिटर 


छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल109.03 रुपये दराने विकले जाते. डिझेल 95.71 रुपये प्रति लीटर