Petrol Diesel Price Today: कच्चा तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या कुठे महाग कुठे स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल
Petrol Diesel Price Today in Marathi: देशातील सरकारी तेल कंपन्या रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. हा दर कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे ठरवला जातो. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर....
Petrol Diesel Price on 10 Jan 2024 : देशभरात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय क्रूडच्या दरांवर आधारित अपडेट केल्या जातात. आज पुन्हा एकदा जागतिक बाजारात क्रूडच्या किमतीत तेजी दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 75 डॉलरवर रिकामा होत असताना, देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे महाग तर कुठे स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 2022 पासून कायम राहिल्या आहेत. अशा परिस्थिती भारतात कच्चे तेल स्वस्त होऊनही पेट्रोल आणि डिझेलचे दर का कमी होत नाहीत आणि तेल कंपन्या किती काळ दर स्थिर ठेवतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 21 मे 2022 ला केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी आणि डिझेलवरील 6 रुपयांनी कमी केले होते. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 106.31 रुपये आणि डिझेलची किंमत 94.27 रुपये आहे.
पेट्रोल आणि डिझेलची किंमत
आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या आधारे, सरकारी तेल विपणन कंपन्या वाहनांच्या इंधनाच्या किंमतीचा दररोज आढावा घेतात आणि दर ठरवतात. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारे चेक करु शकता. राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात. जाणून घ्या मुंबई- पुण्यातील आजचा भाव...
जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
पुण्यातील पेट्रोल 106.20 रुपये आणि डिझेल 92.71 रुपये प्रति लिटर
ठाण्यातील पेट्रोल रुपये 105.89 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोल 106.62 रुपये आणि डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.25 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
एसएमएसद्वारे दर जाणून घ्या आजचे दर
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएसद्वारे चेक करु शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP <डीलर कोड> 9224992249 वर पाठवू शकतात किंवा HPCL ग्राहक 9222201122 किंवा नंबरवर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक RSP <डीलर कोड> 9223112222 या क्रमांकावर पाठवू शकतात.