सांगली : पोलीस कोठडीतील संशयित अनिकेत कोथलेच्या खून प्रकरणात आज दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात. सिंधुदुर्गातील आंबोली येथून सांगलीच्या अनिकेत कोथळेचा मृतदेह आज सिंधुदुर्ग पोलीस व सांगली पोलीस यांनी, संयुक्तरित्या आयोजित मोहिमेतून आंबोलीच्या दरीतून बाहेर काढला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृतदेह दरीमध्ये बेचाळीस मीटर खोल नेऊन तो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जंगलातील आजूबाजूच्या परिसरातील लाकडे गोळा करून पेट्रोलच्या सहाय्याने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसत होते. 


सांगली येथील पोलिसांचे पथक बुधवारी दुपारी वास्तवाचा सुमारास आंबोलीत दाखल झाले होते परंतु बरच गोष्टींची तांत्रिक पूर्तता करण्याचे असल्याने मृतदेह बाहेर काढून पंचनामा करणे यासारख्या गोष्टींचा गुरुवारी सुरुवात करण्यात आली तर दुसरीकडे सांगलीमध्ये या प्रकरणातील आरोपी पी एस आय युवराज  कामटे यांच्यासहीत सहा आरोपीना तेरा  दिवसाची पोलीस कोठडी सांगली न्यायालयाने सुनावली आहे. 


दरम्यान, या ह्या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मृत अनिकेतची पत्नी संध्या कोथळे यांनी केली आहे.