मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सांवाद साधताना पेट्रोल डिझेलवरील कर राज्यांनी कमी करावे असे सांगितले. केंद्र आणि राज्यात आर्थिक ताळमेळ असावा, असे त्यांनी सुनावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ यांनी पेट्रोल डिझेलवरील कर कमी केला नाही. त्यामुळे येथे पेट्रोल, डिझेलचे भाव जास्त असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर टीका केलीय. 


महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात ( डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो.


थेट कर आणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र केले तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. असे असूनही आजही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे.


मुंबईत एक लिटर डिझेलच्या दरामध्ये २४ रुपये ३८ पैसे केंद्राचा तर २२ रुपये ३७ पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे केंद्रीय कर तर ३२ रुपये ५५ पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले आहे ही वस्तुस्थिती नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.


याउपरही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पीएम नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेल दर कर कमी करण्याचे सूचना केल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेऊन पेट्रोल, डिझेलचे दर तात्काळ कमी करून जनतेला दिलासा द्यावा असे ट्विट केले आहे. 


दरम्यान, महाराष्ट्रात आणि अन्य राज्यात पेट्रोलचे दर करीत आहेत हे जाणून घेऊ


दमण - १०२ रूपये, पालघर - १२० रूपये  ( १८ रुपयांनी महाग )


गुजरात - १०५ रूपये, नंदुरबार - १२१ रूपये, ( 24 रुपयांनी महाग )


गोवा - १०६ रूपये, सिंधुदुर्ग - १२२ रूपये ( १६ रुपयांनी महाग ) 


कर्नाटक - १११ रूपये, कोल्हापुर - १२१ रुपये ( १० रुपयांनी महाग ) 


मध्यप्रदेश - ११९ रूपये, गोंदिया - १२१ रूपये ( ३ रुपयांनी महाग )