पुणे : PFI : पीएफआयसंदर्भातील आणखी एक महत्त्वाची बातमी. PFIवर राज्यभरात छापे टाकण्यात आले आहेत. याप्रकरणी 40 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. संभाजीनगरसह मराठवाड्यातून 21 जणांना अटक आली आहे. तर दुसरीकडे धक्कादायक माहिती हाती आली आहे.  भाजपची सत्ता असलेल्या पुणे पालिकेने वादग्रस्त PFIची मदत घेतली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वादग्रस्त PFI संघटनेने पुणे महापालिकेसोबत काम केल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पालिकेने वादग्रस्त PFIसोबत अंत्यविधीबाबत मदत घेतल्याची माहिती पुढे आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर तत्कालीन महापौरांनी करार रद्द केला होता. 


PFIवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा विचार


PFIवर बंदी लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.  NIA, ED छाप्यांमधील पुराव्यांआधारे बंदीचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.  गुप्तचर खात्याच्या हाती पीएफआय कोणते कट रचत होती याची माहिती लागली आहे. तसंच पीएफआयवर बंदी घालावी अशी अनेक राज्यांचीही मागणी आहे. 15 राज्यांमध्ये 106 जागांवर एनआयए ईडीने छापे मारले होते. त्यानंतर आता पीएफआयवर बंदीची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. 


पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरोधात पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि आसामसह अनेक राज्यांमध्ये पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. आठवडाभरात दुसऱ्यांदा पीएफआयवर कारवाई करण्यात येत आहे. 


PFIवर राज्यभरात पुन्हा छापे


पीएफआयवर आज पुन्हा एकदा क्रॅकडाऊन सुरु आहे. मध्यरात्री पीएफआयच्या ठिकाणांवर संभाजीनगर, सोलापुरात छापे टाकण्यात आलेत. संभाजीनगरमध्ये 13 ठिकाणी छापे घालण्यात आले. त्यात 13 जणांना अटक करण्यात आलीय. याशिवाय उर्वरित मराठवाड्यातूनही 7 जणांचा अटक करण्यात आलीय. त्यामुळे मराठवाड्यातून आज एकूण 21 जणांना अटक करण्यात आलीय.  


सोलापुरातूनही एकाला एनआयएने ताब्यात घेतलंय. जुन्या संभाजीनगर परिसरात 13 जणांवर पोलिसांनी नजर होती. पीएफआयच्या महाराष्ट्र अध्यक्षाला औरंगाबादमधून पकडला होता. त्याच्यासह इतरांच्या चौकशीतून या 13 जणांची नावं समोर आली होती. काल रात्री या सर्वाना अटक करण्यात आलीय. सोलापूरमध्ये ताब्यात घेतलेल्या संशयिताला एनआयए पहाटेच दिल्लीला घेऊनही गेली. मालेगावातही दोघांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून दोन जणांना ताब्यात घेतले आहे.