पिंपरी चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरीतील सदगुरु नगर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. सध्या अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या कामगारांवर ही पाण्याची टाकी कोसळून भीषण दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली असून कामगारांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी मोठ्याप्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलं.


बिल्डरने तकलादू बांधलेल्या पाण्याची टाकीमुळे ही दुर्घटना घडल्याच सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तेथे धाव घेतली आहे. सध्या हा ढिगारा हटवून जखमींना बाहेर काढले जात आहे. तसेच सध्या जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे. पण या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह काढण्यास नातेवाईकांडून विरोध दर्शवला जात आहे.