पिंपरी : अमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेझोज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाल्याचं आपण ऐकलं असेलंच. पण काही तासातच ते जेफ दुस-या क्रमांकावर घसरले...मात्र दुस-या क्रमांकावर का घसरले हा प्रश्न सगळ्यांना पडला. हे घडलं पिंपरीमधल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरमुळे...विश्वास बसत नाही ना?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेबीन बेंजामिन एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. आणि त्याच्यामुळेच अमेझॉनच्या सीईओ जेफ बेझोज यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान गमावला.


नेमका हाच धागा पकडत त्याने अमेझॉनला टॅग करत फेसबुक पोस्ट केली. मी आत्ताच अमेझॉनवर ऑर्डर केली आणि जेफ जगातील श्रीमंत व्यक्ती झाली. मात्र नंतर माझे मन बदलले आणि ऑर्डर रद्द केली. त्यानंतर जेफ दुस-या स्थानावर घसरले. मी ऑर्डर रद्द केल्यामुळे असं काही घडलंय का जरा तपासा. सहज विनोद म्हणून टाकलेली हि पोस्ट फेसबुकवर प्रचंड ट्रेंड झालीय.


त्याच्या या पोस्टला काही तासातच एक लाखाहून अधिक लाईक मिळालेत. सहा हजार वेळा शेअर झाली तर साडे सहा हजार कमेंट्स मिळाल्या. पिंपरी गावातून पोस्ट झालेलं हे स्टेटस देशातल्या गुजरातपासून दिल्ली आणि इतर राज्यात शेअर केली गेली. फेसबुकवर त्याला आता असंख्य फ्रेंड रिक्वेस्ट येताहेत. एवढा रिस्पॉन्स मिळेल हे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते.


फेबीन बेंजामिनची फेसबूक पोस्ट