कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : आता बातमी झी इम्पॅक्टची...पिंपरी चिंचवडमध्ये ४९ लाख रुपयांचा रस्ता गायब झाल्याची बातमी झी २४ तासने दाखवली होती... या बातमीनंतर पालिका प्रशासनाला जाग आली आणि या गायब रस्त्याचं काम सुरु झालंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रहाटणी काळेवाडी दरम्यानच्या रस्त्याची अवस्था काही दिवसांपूर्वी अशी होती. तिथं १८ मीटर डांबरी रस्ता हवा होता. प्रत्यक्षात तिथे कामच झाले नव्हते.


पण तरीही या रस्त्यासाठी लागणारा ४९ लाख रुपयांचा निधी महापालिकेने ठेकेदाराला दिला आणि रस्ता पूर्ण झाल्याचा दाखलाही ठेकेदाराला दिला. हे वृत्त झी २४ तासने दाखवलं आणि महापालिकेला जाग आली. इथे आता काम सुरू झालंय. काम सुरू झालंय. पण ते आता लवकरात लवकर पूर्ण करणं तसंच चांगल्या प्रकारचा रस्ता बांधणं गरजेचं आहे.