पिंपरी चिंचवडमध्ये सर्पमित्र नसल्याने सापांचे हाल
पिंपरी चिंचवडमध्ये सध्या महापालिकेचा अधिकृत सर्पमित्र नसल्याने सापांसोबतच नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्याचा एक रिपोर्ट पाहुयात...
कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये सध्या महापालिकेचा अधिकृत सर्पमित्र नसल्याने सापांसोबतच नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्याचा एक रिपोर्ट पाहुयात...
सापांचे हाल
पिंपरी चिंचवड च्या काळेवाडी भागातलं हे दुपारच्या वेळेतलं चित्र.. नदीकाठी आलेला नाग इथल्या एका तरुणाने पकडलाय... ज्याने हा नाग पकडलाय तो सर्पमित्र नाही... पण तरीही त्यानं हा खोडसाळपणा केलाय.. नाग पकडला खरा.. पण त्याला बंधीस्त कसं करायचं हे त्याला जमत नाही.. कधी तो नागाला बाटलीत टाकण्याचा प्रयत्न करतोय... कधी पोत्यात भरण्याचा प्रयत्न करतोय... तर कधी कॅन मध्ये...या सगळ्या प्रकारा नाग बिचारा घाबरुन गेलाय.. आणि तितकाच चिडलाय देखील.. त्याने एकदा सुटण्याचा प्रयत्न ही केला... अत्यंत निर्दयीपणे हाताळलं जात असल्याने हा संतापलेला साप कोणालाही चावू ही शकतो.. तर दुसरीकडे चुकीच्या पद्धतीने हातळल्यामुळे त्याचाही जीव ही जाऊ शकतो... पण महापालिकेला त्याचं काही सोयर सुतक नाही असेच म्हणावं लागेल... कारण शहरात एक ही अधिकृत सर्पमित्र नाही...
महापालिकेचे दुर्लक्ष
यावर प्रशासनाकडून कोणती ही अधिकृत भूमिका सांगण्यात आलेली नाही... पण सत्ताधाऱ्यांनी मात्र आम्ही लवकरात लवकर सर्प मित्र भरती करू असे म्हंटलंय...!
कुणीही साप पकडतोय...
सर्पमित्र नसल्याने जुजबी माहिती असणारा कुणीही साप पकडतोय.. त्यामुळे सापांच्या जिवाला तर धोका आहेच.. शिवाय पकडणा-यालाही धोका आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना होण्यापूर्वी पालिकेनं उदासीन धोरण सोडावं हीच अपेक्षा..