केतन पुरी, झी मीडिया, पुणे : पुण्यातील (Pune) कासारसाई धरणाच्या कडलेला उभारण्यात आलेलं हवेतील तरंगत हॉटेल म्हणजे स्काय डायनिंग हॉटेल (Sky Dining Hotel) वादाचा भोवऱ्यात सापडलंय. स्काय डायनिंग हॉटेलच्या मालकाला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या हॉटेल मालकाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात पहिल्यांदाच सुरु झालेल्या या हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेण्याचं लोकांचे स्वप्न अधूरचं राहणार असल्याचे दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आवश्यक असलेल्या परवानग्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नोटीसीद्वारे दिले आहेत. 120 फुटांवर जेवण्याची सोय करणे ही बाब अत्यंत धोकादायक असल्याचं पोलिसांनी दिलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.


काही दिवसांपूर्वीच या हॉटेलचे उद्धाघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाले होते. उद्घाटनाच्या आधीपासूनच या हॉटेलची जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर अनेकांनी या हॉटेलमध्ये 120 फुटांवर जेवणाचा आस्वाद घेतला होता. मात्र स्काय डायनिंग हॉटेलच्या मालकाने कुठलीच परवानगी घेतली नसल्याचं समोर आलं आहे.


पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या हॉटेल मालकाला नोटीस बजावली असून, सर्व परवानग्या जोपर्यंत घेतल्या जात नाहीत तोपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने हे हॉटेल सर्व परवानग्या मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी यासंदर्भात हॉटेल मालकाला नोटीस पाठवली आहे.


पोलिसांचे स्पष्टीकरण


 "कासारसाई धरणाच्या परिसरात स्काय डायनिंग हॉटेल तयार करण्यात आलं होतं. हॉटेलच्या मालकांनी सुरक्षेविषयी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे लक्षात आलं आहे. त्याबाबत पोलीस स्टेशनकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. लोक अशा प्रकारचे व्यवसाय सुरु करतात ही  चांगली गोष्ट आहे पण जनतेची सुरक्षितता महत्त्वाची आहे. डायनिंगच्या ठिकाणी एखादा अपघात घडण्याची शक्यता आहे. योग्य प्रकारच्या तपासण्या करुन ते सुरक्षित आहे का पाहिले पाहिजे. यासोबत अग्निशमन विभागाचीही परवानगी घेणे आवश्यक आहे," असे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी म्हटले आहे.