पिंपरी चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते काल पुणे मेट्रोचा (Pune Metro) लोकार्पण सोहळा पार पडला. पुणे मेट्रोबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्येही मेट्रोची (Pimpri-Chinchwad Metro) मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी मेट्रोच्या काचेला तडा गेल्याचे समोर आलं आहे. नेमके हे तडे कशामुळे गेलेत हे स्पष्ट नाही, मात्र मेट्रो सुरू होताच काचेला तडे गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 


ही बाब मेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर आधी उडवाउडवीची उत्तर देण्यात आली त्यानंतर हा देखभालीचा भाग असल्याचं सांगण्यात आलं. मेट्रोची दररोज देखभाल होणार आहे, काचांना तडे कसे गेले याची तपासणी केली जाईल असं मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 



पिंपरी-चिंचवड मेट्रोचा मार्ग
पिंपरी ते फुगेवाडी मेट्रोचं (Pimpri Metro) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्या हस्ते रविवारी ऑनलाईन लोकार्पण झालं. त्यानंतर महापालिका पदाधिकारी, अधिकारी आणि काही नागरिकांनी पिंपरी ते फुगेवाडी ((Pimpri To Phugewadi) आणि फुगेवाडी ते पिंपरी असा मेट्रोने प्रवास केला. पिंपरी ते फुगेवाडी हे साडेसात किलोमीटर अंतर गाठण्यासाठी मेट्रोला दहा मिनिटांचा अवधी लागला.