कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुटाचे पैसे मागितले म्हणून टोळक्याने धारदार शस्त्रांनी दुकानदारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरी-चिंचवडमधल्या पिंपरी कॅम्पमधील जमतानी चौकात हे दुकान आहे. या दुकानात एक तरुण बुट घ्यायला होता. बुट घेतल्यानंतर दुकानदाराने त्या तरुणाकडे पैसे मागितले.


दुकानदाराने पैसे मागितल्याचा राग आल्याने या तरुणाने फोन करुन आपल्या साथीदारांना बोलावून घेतलं. यानंतर तलवार आणि कोयते घेऊन दुकानात प्रवेश केला. दुकानात काही ग्राहक होते. पण या ग्राहकांसमोरच टोळक्यांने दुकानदाराला माराहण करत तलवारीने हल्ला केला.



हल्ल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेत जखमी झालेल्या दुकानदाराचं नाव गणेश परब असं आहे. तर किरण डोंगरे, सिद्धार्थ गायकवाड, संतोश पवार अशी या आरोपींची नावं असून एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


हल्ल्याच्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आयुक्त कृष्णप्रकाश यांनी गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.