कैलास पुरी, झी 24 तास, पिंपरी चिंचवड : मुंबईभाई एमबीबीएसमधील सीन तुम्हाला आठवतो का? नसेल तर ही घटना वाचल्यावर तुम्हाला नक्की आठवेल. एक विद्यार्थ्यानं चक्क कॉपी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईल वरून प्रश्नांची उत्तरे देत एमबीबीएस प्रवेश परीक्षेत टॉप करणारा मुन्नाभाई सगळ्यांनाच आठवत असेल. पिंपरी चिंचवड मध्ये ही पोलीस शिपाई भरती परीक्षेसाठी आलेल्या एका विद्यार्थ्याने तीच शक्कल लढवण्याचा प्रयत्न केला खरा पण तो फसला. 


पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत झालेल्या शिपाई पदाच्या भरती परीक्षेत एकाने कॉपी करण्यासाठी चक्क मास्कच्या आत इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवले. मात्र, तपासणीत हा प्रकार लक्षात आला. 



हा प्रकार हिंजवडीतील परीक्षा केंद्रावर घडला. मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक बॅटरी, मोबाईल सिम कार्ड बसवले होते. सहा जिल्ह्यातील ४४४ केंद्रावर घेतलेल्या या परीक्षेसाठी एक लाख ८९ हजार ७३२ उमेदवारांचे अर्ज आले होते.


पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिस शिपाई पदासाठी शुक्रवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. दरम्यान, हिंजवडी येथील ब्लू रिज शाळेत केंद्रात एकाने कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला.


एका परिक्षार्थीने त्याची तपासणी केली असता मास्कमध्ये या वस्तू आढळल्या. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.


पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत काळ शिपाई पदासाठी लेखी परीक्षा काल घेण्यात आली. 6 जिल्ह्यात विविध केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. पिंपरी चिंचवड मध्ये ही विविध केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. 


या लेखी परीक्षेदरम्यान कसला घोळ झाला नसला तरी ती चांगलीच चर्चेत आली. त्याला कारण ठरले एक मास्क. हा मास्क साधासुधा नव्हता तर त्यात वापरण्यात आले होते कॉपी करण्यासाठी ची भन्नाट आयडिया.


या मास्कमध्ये मोबाईलच बसवण्यात आला होता. तो अशा पद्धतीने बसवण्यात आला की पोलीस ही चक्रावून गेले. लेखी परीक्षा झाली असली तरी या भरती प्रक्रियेत कोणी करत असेल त्याच्यावर कठोर कारवाई करू असा इशारा आयुक्तांनी दिला.