पिंपरी चिंचवड : बहुचर्चित स्थायी समितीची निवडणूक आज अखेर पार पडली. महेश लांडगे यांच्या गटाची बंडखोरी औटघटकेची ठरली तर राष्ट्रवादीचा चमत्काराचा दावा फोल ठरला. आमदार लक्ष्मण जगताप गटाच्या ममता गायकवाड स्थायीच्या अधिकृत अध्यक्ष ठरल्या.


पदाधिकाऱ्यांनी राजीनामा अस्त्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थायी समितीमध्ये आपल्या समर्थकाला अध्यक्षपदी स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या आमदार महेश लांडगे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा अस्त्र काढल्याने आणि ते राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार अशी चर्चा झाल्याने पिंपरी चिंचवडमध्ये स्थायीची निवडणूक रंगतदार होणार असा कयास होता. 


महेश लांडगे खरेच नाराज होते का?


प्रत्यक्षात महेश लांडगे गटाचं बंड अगदीच औट घटकेच ठरलं आणि त्यांनी लक्ष्मण जगताप गटाच्या ममता गायकवाड यांना पाठिंबा दिला. लांडगे गटाच्या भरवशावर बसलेल्या राष्ट्रवादीला त्यांची 4 मते मिळाली आणि भाजपला ११ मत मिळत ममता गायकवाड यांचा विजय झाला. या निवडणूक प्रक्रियेत महेश लांडगे खरेच नाराज होते का ते त्यांनाच माहीत. पण एकूणच घडामोडींमुळे त्यांचं महत्व मात्र कमी झालंय