महाराष्ट्रातील `या` गावात आहे भगवान श्रीकृष्ण यांचे सासर; एका शापामुळं झालं होतं उद्ध्वस्त
Amravati: अमरावती जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावात भगवान श्रीकृष्ण यांचे सासर आहे. येथूनच त्यांनी देवी रुक्मिणी यांचे हरण केले.
Amravati: लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे. राज्यात दुसर्या टप्प्यातील मतदान असताना अमरावती मतदारसंघ चर्चेत आहे. अमरावती मतदारसंघात भाजपने नवनीत राणा यांना रिंगणात उतरवले आहे. 2019मध्ये नवनीत राणा अपक्ष म्हणून निवडणुक लढल्या होत्या. त्यांचा विजयही झाला होता. मात्र, यंदा त्या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. अमरावतीची जागा सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. राजकारणाव्यतिरिक्त अमरावतीचे धार्मिक महत्त्वदेखील आहे. अमरावतीचे भगवान कृष्णाचेही कनेक्शन आहे.
अमरावती भगवान कृष्णाचे सासर आहे. येथूनच भगवान कृष्णाने देवी रुक्मिणीचे हरण केले होते. देवी रुक्मिणीचे जन्मगाव कौंण्डण्यपुर हे होते. राजा भीष्मक यांची ती मुलगी होती. असं म्हणतात की भगवान कृष्ण यांनी रुक्मिणीचे हरण तेव्हा केलं होतं जेव्हा ती त्यांच्या मैत्रिणींसह अंबादेवीच्या दर्शनासाठी जात होती.
कौंडिण्यपूर हे अमरावतीपासून 41 किमी दूर आहे. कौंडण्यपुर ही विदर्भाची प्राचीन राजधानी म्हणून ओळखली जायची. हिंदू मान्यतेनुसार, देवी रुक्मिणीच्या भावाने त्यांचे लग्न शिशुपालासोबत ठरवले होते. मात्र एकीकडे देवी रुक्मिणीने मनोमन श्रीकृष्णाला वर मानले होते. ठरल्याप्रमाणे देवी रुक्मिणीच्या स्वयंवर रचले गेले. देवी रुक्मिणीच्या भावाला व वडिलांना त्यांचे लग्न शिशुपालासोबत व्हावे, अशी इच्छा होती. मात्र, स्वयंवरापूर्वी देवी रुक्मिणी यांना देवदर्शन करायची इच्छा झाली.
ठरल्याप्रमाणे त्या कुलदैवत असलेल्या अंबा देवीच्या दर्शनासाठी गेल्या. त्याचवेळी देवी रुक्मिणीच्या मैत्रिणीही त्यांच्यासमवेत होत्या. तेव्हा तिथे आधीच उपस्थित असलेल्या श्रीकृष्णाने रुक्मिणीला पळवून नेले. रुक्मिणीचे हरण झाल्याचे वृत्त समजताच सर्व राजांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्यात घनघोर युद्धदेखील झाले. श्रीकृष्णाच्या मागे उभा असलेल्या बलरामाच्या सैन्यांने सर्वांना पराभूत केले.
रुक्मिणीचा भाऊ रुक्मीने त्याचा मित्र शिशुपालला रुक्मिणीसोबत लग्न लावून देण्याचा शब्द दिला होता. पण अचानक कृष्णाने येऊन तो डाव उधळून लावला. त्यामुळे संतापलेल्या शिशुपालाने, 'तुझी राजधानी पालथी होईल' असा शाप रुक्मीला दिला आणि कौंडिण्यपूर शहर पालथे होऊन गाडले गेले, असं येथील गावकरी सांगतात.
कौंडिण्यपूर गावाच्या बाजूनेच वर्धा नदी वाहते. या नदीच्या काठावर एका उंच टेकडावर आहे रुक्मिणीचे मंदिर आहे.
कौंडिण्यपूर आणि प्रभू श्रीरामाचे आजोळ
विदर्भनंदन राज्याची राजधानीचे शहर कौंडिण्यपूर होते. रामाची आजी, अज राजाची पत्नी इंदुमती (राजा दशरथाची आई), अगस्तीची पत्नी लोपामुद्रा तसेच भगीरथमाता सुकेशिनी या सर्वांचे माहेर 'कौंडिण्यपूर' हे होते. नल व दमयंतीचा विवाह हा येथेच झाला