सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी या बाजार समितीमध्ये होणारे बेदाण्याचे सौदे ऑनलाईन बघणार आहेत. व्हि़डीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी हे बेदाण्याचे सौदे पाहणार आहेत. देशाचे पंतप्रधान अशा प्रकारे सौदे पाहण्याचा हा पहिला-वहिला प्रकार ठरतोय.


मोदींचं 'ऑनलाईन' लक्ष!


सांगलीत बेदाण्याची मोठी बाजारपेठ आहे. याच बाजारपेठेत होणारे सौदे मोदी पाहणार आहेत. याशिवाय राज्यातील तीसहून अधिक बाजार समितीमधील सौदे पंतप्रधान मोदी पाहणार असल्याची माहिती मिळतेय.


'ई-नाम'नुसार लिलाव 


शेतीमालाला सुलभ बाजारपेठ उपलब्ध व्हावी, योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी व्यापार म्हणजेच ई-नाम हा ऑनलाईन मार्केटिंग उपक्रम सुरू केलाय. पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० बाजार समित्यांमध्ये हा उपक्रम सुरू होतोय. 


सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून बेदाणा या शेतीमालाचा समावेश ‘ई-नाम’ अंतर्गत केलाय. त्यानुसार बेदाण्याचे ई-लिलाव होतील.


टप्प्यांमध्ये होणार लिलाव


पहिल्या टप्प्यात सौद्याच्या ठिकाणी उपस्थित असलेले खरेदीदार व्यापारी ‘ई-लिलाव’ मध्ये सहभागी होतील. भविष्यात देशातील अन्य खरेदीदारही ऑनलाईनद्वारे सौद्यात सहभागी होतील आणि दरासाठी स्पर्धा वाढेल. शेतकर्‍यांना अधिक दर मिळणे शक्य होणार आहे.