COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामराजे शिंदें, झी मीडिया,कोल्हापूर : कोल्हापूरच्या विद्यार्थ्यी अजूनही एका आश्चर्याच्या धक्क्यातून सावरले नाहीएत. एकतर या विद्यार्थ्यांची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट तर झालीच पण पंतप्रधानांनी यावेळी विद्यार्थ्यांशी चक्क मराठीतून संवाद साधला. यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झालायं. त्यांनी आपला हा आनंद झी मीडियाकडे व्यक्त केलायं.


पंतप्रधानाांना भेटण्याची संधी 


कोल्हापुरच्या विद्यार्थ्यांनी नुकताच पंतप्रधान मोदींनी संवाद साधला. आणि तोही चक्क मराठीत...होय राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडीक यांनी मतदारसंघात विचारा प्रश्न स्पर्धा घेतली. त्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या  मुलांना संसदेत पंतप्रधान मोदींना भेटण्याची संधी मिळाली. यावेळी खासदार धनंजय महाडीक यांच्या विद्यार्थ्यांशी मोदींनी चक्क मराठीत संवाद साधून सगळ्यांना आश्चर्यचा धक्का दिला.