कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी - एकीकडे अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असतानाच दुसरीकडे पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची अक्षरशः थट्टा केली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले अशांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळते. पण अशी एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये शेतकऱ्याला काहीसे रुपये खात्यात जमा केले आहेत. ही रक्कम इतकी लहान होती की अक्षरशः हसावं की रडावं हाच प्रश्न त्या शेतकऱ्यासमोर उपस्थित झाला असावा. (Pmfby scheme crop insurance company mocked the farmer paid five rupees as compensation latest marathi news nz)


हे ही वाचा - आदित्य ठाकरेंनी कोणाला फुकट सल्ला देऊ नये, राधाकृष्ण विखेपाटील यांच्या टीकेवर दानवेंचं उत्तर



एका गुंठ्यामागे चक्क ५ रुपये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत तालुक्यातील केलवड येथील बाबूराव गमे या शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून एका गुंठ्यामागे चक्क ५ रुपये प्रमाणे खात्यात रक्कम जमा झाली आहे. यामुळे पीक विमा कंपन्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांना दिला आहे.


हे ही वाचा - शिवसेना कार्यकर्त्यांनी उधळपट्टी केल्याचा VIDEO आला समोर 



न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा


बाबूराव गमे यांनी त्यांच्या सहा एकराहून अधिक क्षेत्रात सोयाबीन पीकाची शेती केली होती. त्यांनी सगळ्या क्षेत्राचा जवळपास तीन हजार रुपये विमा उतरवला होता. अतिवृष्टीमुळे केलवड गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. मात्र ज्यावेळी नुकसान भरपाई देण्याची वेळ आली त्यावेळी विमा कंपन्यांनी बाबुराव गमे यांच्या खात्यावर १४०६ रुपये म्हणजे गुंठ्यामागे ५ रुपये प्रमाणे नगण्य रक्कम जमा केली.


हे ही वाचा - सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार, 72 वर्षीय वृद्धाला ब्लॅकमेल करत उकळले लाखो रुपये


 


हीच परिस्थिती इतर शेतकऱ्यांची असून काहींच्या खात्यात ५, ३८, ४३, ५६, ७० ९०,१०० ते १३० अशी रक्कम जमा झाली आहे. तर अनेकांचे नुकसान होऊनही ते विम्या पासून वंचित आहेत. विमा कंपन्यांच्या या धोरणामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आता न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.