पुणे : पीएमपीएल बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे झालेल्या पुण्यात वर्दळीच्या रस्त्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अप्पर इंदिरा नगर इथे हा अपघात झाला. सकाळी सव्वा अकराच्या सुमाराला अप्पर इंदिरा नगरातून निघालेल्या बसचे ब्रेक फेल झाले आणि या बसने समोरून येणाऱ्या वाहनांना जोरदार धडक दिली. 


या अपघातात दोन पीएमपी, एक डंपर, एक ट्रक, टेम्पो आणि दुचाकी अशा सात वाहनाचं मोठं नुकसान झालंय.