`माझ्या नादी नका लागू, खाली उतरुन मारेन`, कारचालकाची अधिकाऱ्याला धमकी; पोलिसांनी घरात घुसून...; संभाजीनगरमधील घटना
!['माझ्या नादी नका लागू, खाली उतरुन मारेन', कारचालकाची अधिकाऱ्याला धमकी; पोलिसांनी घरात घुसून...; संभाजीनगरमधील घटना 'माझ्या नादी नका लागू, खाली उतरुन मारेन', कारचालकाची अधिकाऱ्याला धमकी; पोलिसांनी घरात घुसून...; संभाजीनगरमधील घटना](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2025/01/27/838545-chhatrapati-sambhajinagar-car-viral-video.jpg?itok=9ylS6BOA)
पोलिसांवर अरेरावी करत बदली करण्याची धमकी देणाऱ्या मुजोर धनदांडग्या वाहनचालकाचा पोलिसांनी माज उतरवला आहे.
पोलिसांवर अरेरावी करत बदली करण्याची धमकी देणाऱ्या मुजोर धनदांडग्या वाहनचालकाचा पोलिसांनी माज उतरवला आहे. छत्रपती संभाजीनगरशहरातील एका चारचाकी वाहन चालकाचा पोलिसांशी हुज्जत घालणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी त्याची 2 कोटींची गाडीदेखील जप्त केली आहे. पोलिसांनी मुजोर चालकाला चांगलाच धडा शिकवला. पाहुयात, याविषयीचा एक रिपोर्ट.
पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकी देणारा कुणाल बाकलीवाल पाहा. सुसाट वेगात व्हीआयपी सायरन वाजवत जाणा-या मुजोर बाकलीवालला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ज्या कारचा तो पोलिसांना माज दाखवत होता ती त्याची महागडी डिफेंडर गाडी जप्त करून पोलिसांनी त्याला चांगलाच धडा शिकवला आहे. मात्र हा व्हीडिओ व्हायरल झाला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली आणि त्याला राहत्या घरातून ताब्यात घेतलं.
संभाजीनगरातील या मुजोर चालकाचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. अनेकांनी त्याच्यावर संताप व्यक्त कारवाईची मागणीही केली.
काय आहे प्रकरण?
- वाहतूक शाखेचे अंमलदार दैनसिंग जोनवाल हे सहायक फौजदार बागूल यांच्यासह २४ जानेवारी रोजी सायंकाळी मिल कॉर्नर सिग्नलवर कर्तव्यावर होते
- यावेळी बाकलीवाल व्हीआयपी सायरन वाजवत महागड्या डिफेंडर गाडीतून जात होता
- पोलिसांनी त्याला थांबवल्यानंतर त्यानं पोलिसांना अर्वाच्च शिवीगाळ करून धमकवलं
- कुणाल बाकलीवाल असं आरोपीचं नाव असून क्रांती चौक ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतात. अशा वेळी कायदा मोडून वर कर्तव्यावर असणा-या पोलिसालाच धमकावण्याचा गंभीर गुन्हा या बाकलीवालनं केला होता. हा माज पैशाचा आणि राजकीय ओळखीचा होता. त्यामुळंत या मुजोर चालकावर कडक कारवाई करणं अत्यंत गरजेचं होतं. अरेरावी करणा-या चालकाचा पोलिसांनी माज उतरवला, हे बरं केलं.